स्वतःचं स्वप्न साकार करू पाहणार्या काही वाचकांना या पुस्तकातून निश्चितच एक दिशा आणि प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहेच, पण आपापल्या क्षेत्रात नेतृत्व कसं करावं आणि व्यावसायिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय दर्जा कसा अंगी बाणवावा, याचेही काही मंत्र मिळून जातील. — सचिन तेंडुलकर टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेऊन जातो. कॅमेर्याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याच कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाऊन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भारतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भोगलेचं वेगळेपण नेमकं यातच आहे. — शेखर गुप्ता खेळाबाबत प्रेम आणि ज्ञान यांच्या अपूर्व संगमाचे स्पष्ट प्रतिबिंब हर्षाच्या शैलीदार लिखाणात दिसते.