Skip to product information
1 of 1

One Page Story by Dr. Vikram Lokhande

Description

“डॉ. विक्रम लोखंडे यांच्या ‘वन पेज स्टोरी’ या कथासंग्रहाचे स्वागत करताना मला मन:पूर्वक आनंद होत आहे. या संग्रहातल्या बऱ्याच कथा नात्याशी सबधित आहेत. नाती. त्यातन निर्माण होणाऱ्या अपेक्षा. अपेक्षाभंग, फसवणूक अनेक कथांमधून दिसून येते. खरंतर या सगळ्यात लेखकाला कशाचं महत्त्व वाटतं, लेखक कशाचं कौतुक करतो यावर कथांचं मोठेपण ठरतं. या संग्रहातील अनेक कथामधून लेखकान माणसाच्या उदार वृत्तीचं दर्शन घडवलं आहे.‘वन पेज स्टोरी’चा फॉर्म हा चतुराईची मागणी करणारा आहे. लेखक आपल्याला हात धरून एका दिशेने घेऊन जातो आणि पोहोचल्यावर आपण भलतीकडेच आलो असं वाचकाच्या लक्षात येतं. परंतु फसवणूक सुद्धा आनंददायक आहे असं वाटायला लावणाऱ्या काही कथा या संग्रहात आहेत.”– प्रा. अजित दळवी “आपण डॉक्टरला आपल्यासारखी तीही माणसंच आहेत अस समजत नाही. खूपदा शस्त्रक्रियेमुळे तर त्यांना भावना आहेत असंही आपल्याला वाटत नाही. वर्दीत पद पाहतो आपण, माणूस बघत नाही किंवा तशी वेळही खूपदा येत नाही. पण काही भन्नाट गोष्टी घडतात आणि वर्दीतल्या माणसांची ओळख होते.डॉ. विक्रम लोखंडे यांचं ‘वन पेज स्टोरी’ हे पुस्तक म्हणजे असाच भन्नाट कथासंग्रह. भरमसाट पानं सांगू शकत नाहीत एवढं ‘वन पेज स्टोरी’ एका पानात सांगून जातात. एरव्ही आपल्याला डॉक्टरला भेटून बरं वाटतं, पण या डॉक्टरला वाचूनही बरं वाटेल याची खात्री आहे.”– अरविंद जगताप
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
One Page Story by Dr. Vikram Lokhande
One Page Story by Dr. Vikram Lokhande

Recently viewed product

You may also like