मीटिंग्ज... कामानिमित्त प्रवास... सतत बाहेरचं खाणं... डेडलाइन्स... आणि या सगळयामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव! ...ऑफिस म्हटलं की, हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार! या सगळया समस्यांच्या मुळाशी गेल्यास, त्याचं मुख्य कारण असतं - बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार - अशी अनियमित जीवनशैली.या पुस्तकात सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा, हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच 'फास्ट लाइफस्टाइल'मुळे उद्भवणार्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी 'प्रॅक्टिकल' व सहजशक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत.