Skip to product information
1 of 2

Nava Akash (नवं आकाश ) by Narayan Sawale

Description

1 frश्री. नारायण सावळेबी. कॉम., सी. ए. आय. आय. बी. पार्ट निवृत्त अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया"नवं आकाश" हे आत्मचरित्र असून जवळपास ९०-९५ वर्षांचा कालखंड समाविष्ट आहे. माझ्या आई वडिलांच्या आयुष्यातील ग्रामीण भाग, त्यांची जीवनशैली आणि माझ्या कुटुंबाची ग्रामीण ते शहरी भागाकडे वाटचाल कशी होत गेली, आयुष्यामध्ये जे चढउतार झाले त्याप्रमाणे वेगवेगळ्या वळणावर आलेल्या अनुभवाची सुखदुखाःची वाट व मित्रांची साथ शालेय जीवन वेळेप्रमाणे करावी लागलेली कष्टाची कामे, माणूस म्हणून जगण्याची धडपड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या दुसऱ्या आईचा माझ्या जीवनात झालेला प्रवेश, आलेला प्रदीर्घ अनुभव माझ्या आयुष्याला कशी कलाटणी देऊन गेला याचे वास्तव. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाचे सर्वतः विस्तारणे, त्याचबरोबर सामाजिक ऋण जाणून थोडे बहुत जे कार्य केल्याचा आनंद आणि बँकेच्या माध्यमातून केलेली विविध ठिकाणची भटकंती, निसर्गाचे योगदान याबद्दल विस्तृत मनोगत व्यक्त केले आहे.भारतामध्ये कोरोना १९ विषाणूचा मार्च २०२२० झालेला प्रारंभ व माझी लिखाण करण्याबाबतची सुप्त इच्छा, मला मात्र घरी बसल्यानंतर बऱ्याच गोष्टी लिहिण्यास प्रेरणा देऊ लागल्याने कथेचा प्रारंभ झाला. माझ्या मित्रांचा व माझी धर्मपत्नी सौ. सविता हिच्या सहकार्याचा खूप मोठा वाटा आहे. प्रथमच लिहिताना संपूर्ण जरी नसले तरी काही अंशी मी निश्चितच यशस्वी झालो आहे असे वाटते. सततचा शिक्षणाचा ध्यास, अथक परिश्रम, चिकाटी, व कष्ट केल्याने परिस्थितीवर मात करता येते हे नक्की. मी माझ्या छोट्याशा विश्वात खूप समाधानी आहे. स्टेट बँकेचे, माझ्या दुसऱ्या आईचे प्रेम माझ्या निवृत्ती नंतरही सुरुच आहे व ती जीवनाच्या किनाऱ्यावर नक्की घेऊन जाईल याची पूर्णतः शाश्वती आहे. आपणही नेहमी समाधानी व आनंदी रहावे...
Regular price
Rs. 300.00
Regular price
Sale price
Rs. 300.00
-0%
Nava Akash नवं आकाश by Narayan Sawale
Nava Akash (नवं आकाश ) by Narayan Sawale

Rs. 300.00

Recently viewed product

You may also like