ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा.रं.बोराडे यांचा हा कथासंग्रह. रा. रं. बोराडे यांच्या कथांतून ग्रामीण जीवनातील आचार-विचार, वर्तनसंकेत, श्रद्धास्थाने, सामाजिक संकेत, जीवन जगण्याच्या पद्धती व त्या निमित्ताने व्यक्त झालेल्या त्यांच्या भावभावना या सर्वांचा आविष्कार झालेला आहे. व्यक्तीच्या जन्माबरोबरच त्याची नाती जन्म घेतात आणि ती त्याला जोपासावी लागतात. नातेसंबंध सांभाळताना कधी स्वत:चे अस्तित्वही हरवावे लागते.
ग्रामीण जीवनात मानसन्मानाला, नात्यागोत्याला विलक्षण महत्त्व देणारी ही माणसं व हे संबंध सांभाळताना त्यांची होणारी फरफट बोराडे यांनी ह्या कथासंग्रहातील कथांनकांत मांडली आहे. मानवी स्वभावाचे बारकावे टिपत जाणार्या ह्या कथा वाचकांना अंतर्मुख करायला लावतात, हेच ह्या कथासंग्रहाचे बलस्थान होय!