लडाख म्हणजे भारताचा सगळयात उंच भाग. तुम्ही गेला आहात लडाखला? नाही? मग तुम्ही हे पुस्तक वाचायला हवे. आणि जाऊन आला असाल, तर हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे. पर्यटनापलीकडचे लडाख, जुजबी परिचयापलीकडची लडाखी माणसे, छायाचित्रांपलीकडची लडाखी संस्कृती हे सारे संवेदनशीलतेने जाणून घेत लेखिका लडाखच्या भूमीशी, लडाखी बांधवांशी पश्मिनी धाग्यांचे बंध जुळवते. शब्दांमधून लडाखचे केवळ दर्शन घडवत नाही, तर वाचकालाही लडाखशी जोडून टाकते. या आगळयावेगळया पुस्तकातून साऱ्यांचेच जुळते...