प्राचीन मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी ज्याचा आवजूर्न अभ्यास करावा असे कवी नरेंद्राचे ‘रुक्मिणीस्वयंवर’ हे काव्य आहे.
नरेंद्राप्रमाणेच नृसिंह व शल्य हे त्याचे बंधू रामदेवराय यादवाचे सभाकवी होते. नरेंद्राच्या अभिजात प्रतिभेमुळे
त्याला राजमान्यता-पंथमान्यता, जनमान्यता-रसिकमान्यता मिळाली - ती आजवर.
डॉ. वि. भि. कोलते, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. सुरेश डोळके इत्यादी पंडितांनी मराठीतील या आद्य महाकाव्याची
चौफेर समीक्षा केली आहे. आता डॉ. सुहासिनी इर्लेकर या कवयित्रीने या ग्रंथात कवी नरेंद्रचे प्रतिभावैभव साक्षेपाने टिपले आहे. रसिकांच्या दरबारात या कवयित्रीच्या काव्यसंपदेलाच नाही; तर तिच्या संशोधनालाही मानाचे स्थान आहे.