समुद्रकिनार्यालगतच्या भागात जरी नारळ मोठया प्रमाणात पिकत असला, तरी नारळ स्वयंपाकासाठी सर्वत्रच विविध प्रकारे वापरला जातो. हा वापर केवळ चवीसाठी किंवा पदार्थातील एक पुरक जिन्नस म्हणून मर्यादित राहिलेला नाही. नारळाचा स्वतंत्रपणे वापर असलेल्या अनेक पाककृतींची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.
पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांनी अशा विविध पदार्थांचा शोध घेऊन, अनेक प्रयोग करून केवळ नारळाच्या पदार्थांचे हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकात नारळाचा वापर असलेले अनेक अल्पोपाहाराचे पदार्थ, भात-पुलावाचे विविध प्रकार, तसेच सार-करी यांचा समावेश आहे व त्यासोबत लागणार्या चटण्या, कोशिंबिरी-रायतीही आहेत. नारळाचे विविध गोड पदार्थही पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकामुळे रसिकांना नारळाचे वैशिष्टयपूर्ण पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत.