...आणि गंमत अशी आहे की, तुमचा धर्म हा तुमच्या भीतीचा विस्तार आहे. तुमचे सगळे तथाकथित भगवान, तुमच्या भीतीची धारणा आहेत. तुम्ही तीर्थस्नानं करा; मंदिर, गुरुद्वारा करा; पूजा-प्रार्थना सर्व व्यर्थ आहे. कारण जोपर्यंत तुमच्या हृदयातून आस्थेचा स्वर उमटत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला हाक मारलेली नाही. जिथे शंका आहे, तिथे परीक्षा आहे. आस्थावान व्यक्ती कधी परमात्म्याची परीक्षा घेत नाही. ती काही मागतही नाही. ज्या दिवशी तुमच्या शंका संपतील, तुम्हाला त्याचा प्रतिसाद मिळेल. प्रार्थना न करताही तो तुम्हाला प्राप्त होईल