ना. ग. नारळकरनाना कोण होते ?कुणी म्हणावे नाना पूर्णार्थाने शिक्षक होते, कुणी म्हणतात नाना म्हणजे स्वदेशी व राष्ट्रभक्ति यांचे प्रतीक, कुणाला वाटते नानांसारखा कुशल विक्रेता दुसरा नाही, संस्थाचालक म्हणूनही नानांची थोरवी मोठी होतीच. पण त्यांचे सर्वांत मोठे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या दोन तीन पिढ्या, स्वतःच्या आदर्शाने घडविल्या.म्हणूनच -वाचून विसरून जाण्यासारखे नानांचे चरित्र नाही, केवळ भक्तिभावाने जतन करावे असे नानांचे चरित्र नाही, जीवनांत जे जे काही रम्य आहे,उत्कट आहे, आदर्श आहे - थोडक्यात जगण्यासारखे आहे ते मिळविण्याचा मंत्र म्हणजे नानांची जीवन दृष्टी.वैफल्य किंवा पलायन टाळून जीवनाला सामोरे कसे व्हावे,स्वत्व न गमविता जीवनाचे सार्थक कसे करावे,ऐहिक सौख्याकडे पाठ न फिरविताआध्यात्मिक आनंद, चिरकाल समाधान कसे मिळवावे याचे यथातथ्य मार्गदर्शन म्हणजे या पुरूषोत्तमाचे चरित्र.