ग्रामीण भागातील हुशार मुलगा मणिभद्र यास पीएच.डी. मिळवण्याचा ध्यास... कात्यायिनी मठाचा भावी धर्मगुरू होण्याची संधी त्याच्याकडे चालून येते आणि तो ती स्वीकारतो...मात्र त्यामुळे त्याला आजन्म ब्रह्मचारी राहावं लागणार असतं...डॉ. नभा महंती ही तरुण अध्यापिका तिच्या प्रकल्पासाठी सहायक म्हणून मणिभद्रची निवड करते...ती त्याच्या प्रेमात पडते...सुरुवातीला तिच्या या भावनेपासून अनभिज्ञ असलेल्या मणिभद्रला तिची भावना कळते...मात्र धर्मशास्त्रातील आणि शिक्षणशास्त्रातील यशाच्या पायNया चढलेला मणिभद्र नभाचं प्रेम स्वीकारू शकत नाही...वासनारहित, आत्मिक प्रेमाची महती मणिभद्र नभाला सांगू पाहतो...धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा दूर करून समाजाला विधायक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करताना मणिभद्र धर्मगुरू होतो...मात्र त्याला स्वत:च्या भावनांचा बळी द्यावा लागतो...धर्म आणि लौकिक जीवन यांच्यातील द्वंद्वाचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी ‘नभांतमणी’.