हरवणार्या मराठी भाषेला, दूर जाणार्या परस्परसंबंधांना, विसंवादाला प्रतीकात्मकरीत्या मांडणारं, अमूर्त अशा सत्याला शरीररूप देणारं, खरं तर वास्तवतेचंच चित्रण करणारं हे नाटक आहे. त्याला गोष्ट नाही, त्यात वाहून जाता येत नाही. या नाटकात व्यक्तिरेखा नाहीत, पात्रं आहेत ती निमित्तमात्र आहेत. ती परिस्थितीचं शरीररूप आहेत. वाहकही आहेत. अर्थवाही नांदी, सूत्रधार, आजची सिस्टीम (म्युझिक) पारंपरिकता आणि प्रायोगिकता या सर्वांचं शेजारीकरण आहे. इतर नाटकांसारखं हे नाटक एन्जॉय करता येणार नाही, ते मुरवायला हवं. माणसाचा र्हास सर्वच शोकात्मिकांचा विषय असतो. भाषेचा र्हास दाखवणारं ‘म्युझिक सिस्टीम’ एकमेवाद्वितीयच. त्याचं स्वागत करायला हवं. - कमलाकर नाडकर्णी