उजव्या हातात पिस्तूल घेऊन एखादी बाई स्वत:च्या डाव्या कानशिलावर गोळी कशी मारून घेऊ शकते? फ्रेंच मोलकरणीला भूत दिसणं आणि अत्यंत गुप्त अशा लष्करी योजनांचे कागद चोरीला जाणं या दोन गोष्टींत काय लागाबांधा होता? विक्षिप्त स्वभावाचा सर जेर्व्हेस शेव्हेनिक्स-गोअर याला ठार करणार्या पिस्तुलाच्या गोळीनं खोलीच्या दुसर्या बाजूला असलेल्या भिंतीवरचा आरसा कसा फुटला? रूपवान व्हॅलेंटाईन शँट्री हिनं स्वत:चा प्राण वाचवण्यासाठी र्होड्सच्या बेटावरून पलायन करावं का? आणि गुंतागुंतीचा प्रेमाचा त्रिकोण तिथे तिनं तयार करून ठेवला होता त्याचं काय?
या चार रहस्यमय प्रकरणांना हर्क्युल पायरोला तोंड द्यायचं आहे. यातलं प्रत्येक प्रकरण स्वभावचित्रणाचा, एकापाठोपाठ एक घडत जाणार्या वेगवान घटनांचा आणि उत्कंठा शिगेला पोहचवणार्या चित्तथरारक रहस्यांचा अत्युत्कृष्ट असा नमुना आहे.