Skip to product information
1 of 2

Mumbai Te Mumbai Bhag 1 v 2 (मुंबई ते मुंबई भाग १ व २ ) By Ajit Vartak

Description

मुंबई ते मुंबई हे पुस्तक म्हणजे अजित वर्तक नावाच्या एका ' आनंदयात्री ' चे आपल्या देश - विदेशातील ' फिरस्तेगिरी ' चे मनोवेधक वर्णन आहे. वडिलांच्या रेल्वे मधील नोकरीमुळे लहानपणापासून देशातल्या प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी श्री अजित वर्तक यांची निघालेली ही ' फिरस्ता एक्स्प्रेस ' रुळत रुळत त्यांची पन्नाशी उलटली तरी आजतागायत रूळावर धावतच आहे. लेखकाने १९९४ ते २०२४ अशा तीस वर्षांच्या आपल्या देशांतर्गत व विदेशात (इंग्लंड व युरोपीय देश) केलेल्या फिरस्तेगिरीचे रसाळ, मनोवेधक वर्णन वरील पुस्तकाच्या दोन भागांतून वाचकांच्या समोर ठेवले आहे. लेखक कॉम्प्युटर इंजीनियर असल्याने भारतातील विविध नामांकित आयटी कंपन्यांमधे उच्च पदांवर त्यांनी नोकरी केली. त्यानिमित्ताने देशात व परदेशात वेळ मिळेल तेव्हा मनसोक्त भटकंती झाली. शेजारी - पाजारी, कुटुंबिय, नातेवाईक, शाळा कॉलेज मधील जुने मित्र, नोकरीतील सहकारी यांच्या साथ संगतीने आळंदी पुणे पासून ते बोर्डी, हिवरे (जि. नाशिक ) किहीम, पारगाव, माथेरान, लोणावळा (मन:शक्ती केंद्र ), वडोदरा, अहमदाबाद, राजस्थान, मथुरा, हरिद्वार, ग्वाल्हेर ते जम्मू लेह पर्यंत तसेच लंडन, युरोप, मलेशिया, सिंगापूर अशी ही ' फिरस्ता एक्स्प्रेस ' फिरत राहिली. या भटकंतीमधे आलेले कडू - गोड अनुभव, किस्से त्यांनी ओघवत्या शैलीत मांडले आहेत. लेखक श्री. अजित वर्तक यांच्या आई कै. श्रीमती. नीलाताई वर्तक यांनी पुस्तकाच्या भाग दोन मध्ये त्यांनी केलेले (प्रकरण ११ - १२) त्यांच्या परदेशवारीचे सुंदर वर्णन वाचताना असे लक्षात येते की लेखकाला लेखन शैलीचे बाळकडू हे त्यांच्या आईकडूनच मिळालेले आहे. पुस्तक वाचताना आपला मित्रच त्याने केलेल्या प्रवासाचे रसभरीत वर्णन आपल्याला ऐकवित आहे असा भास होतो आणि त्यामुळे पुढे काय असेल अशी उत्सुकता वाढीस लागते. म्हणून मला असे वाटते की लेखकाच्या लेखनाचे हेच बलस्थान आहे. तसेच प्रवासप्रेमींसाठी हे पुस्तक माहितीपूर्ण व उत्तम मार्गदर्शक आहे. लेखकाने आपल्या ह्या आनंदयात्रेमध्ये लिड्सच्या हिंदू मंदिरात पंजाबी, गुजराथी बांधवांनसह पुढाकार घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. आपल्या मित्रांसह त्यांनी हिवरे येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान आणि वृक्षारोपणही केले. यातून दिसणारी त्यांची सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच लंडन स्थित वासुदेव गोडबोले यांच्या भारतीय इतिहासाशी निगडित स्पेशल टूर मध्ये लेखकाची सामिलकी देशप्रेम दर्शविते. ह्या पुस्तकात विचारपूर्वक समाविष्ट केलेले सुंदर फोटो, अर्थपूर्ण व विषयाला साजेसे श्री. सतीश भावसार आणि श्री. आशुतोष बर्वे यांनी केलेले मुखपृष्ठ त्याचबरोबर श्री. राजेश बोरसे यांची समर्पक व्यंगचित्रे आणि श्री.जयराज साळगावकर, लेखक आणि कवी श्री.प्रवीण दवणे, डॉ. स्मिता दातार, श्री.अंबरीश मिश्र, आणि श्री. सुनंदन लेले या दिग्गजांच्या लाभलेल्या प्रस्तावना आणि अभिप्राय तसेच लेखकाच्या ओघवत्या लेखनशैली मुळे या पुस्तकाने वेगळीच उंची गाठली आहे.
Regular price
Rs. 1,000.00
Regular price
Rs. 1,198.00
Sale price
Rs. 1,000.00
-17%
Mumbai Te Mumbai Bhag 1 v 2 (मुंबई ते मुंबई भाग १ व २ ) By Ajit Vartak
Mumbai Te Mumbai Bhag 1 v 2 (मुंबई ते मुंबई भाग १ व २ ) By Ajit Vartak

Rs. 1,000.00

Recently viewed product

You may also like