मुलं ही आपली संपत्ती आहे. तिच्या विकासासाठी सगळे काळजी घेत असतात. मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी छोट्या-मोठ्या गोष्टींची मदत होत असते.मुलांत चांगल्या सवयी वाढाव्यात म्हणून या पुस्तकात अनेक उदाहरणांतून गुरुमंत्रच सांगितला आहे. आईवर न चिडता तिचं ऐकलं पाहिजे. चूक झाल्यास कबूल करून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिस्तीची सुरुवात स्वतःपासूनच करावी. भरपूर खेळा व तसेच अभ्यासही करावा. चिडू नये आणि रडू नये. अडलं तर दुसऱ्यांची मदत घ्यावी. सतत नवं शिकण्याची कास धरा. हे गुरुमंत्र अंगीकारले, तर जीवनात यश हमखास चालत येईल. मात्र त्याकरिता जिद्दीने प्रयत्न करावयास हवेत.