ऑड्री हेपबर्न या सुप्रसिद्ध व लोकप्रिय अशा अभिनेत्रीचा
हा जीवनपट प्रत्येकाने जरूर वाचावा असे मी म्हणेन. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो वाचकाला गुंतवून ठेवतो!
अनुपम सौंदर्य, विभोर, विशाल नेत्र व निरागसता, अभिनय व नृत्यनैपुण्य या गुणांमुळे तिचे अनेक चित्रपट गाजले.
ऑस्कर व इतर पुरस्कार, विपुल धन तिच्याकडे चालून आले.
वैयक्तिक जीवनात ती सुगृहिणी, सुमाता व आदर्श पत्नी होती. आयुष्याच्या उत्तरार्धात UNICEF ची राजदूत म्हणून अनेक विकसनशील देशात जाऊन तेथील रंजल्या-गांजल्यासाठी, विशेषत: बालकांसाठी तिने जे अथक
परिश्रम घेतले, त्यास तोड नाही.
ह्या चरित्राने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. प्रत्येक साहित्य आणि सिनेरसिकाने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे. डॉ. विनीता महाजनी या सिद्धहस्त लेखिकेच्या हातून चितारला गेलेला, असा हा अमूल्य ठेवा आहे.
त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
- अरुण फिरोदिया