एफएमए बँक' ही अमेरिकेतील एक मात्तबर बैंक तिच्या एका शाखेतील मोठी रक्कम दिवसा ढवळ्या अद्दश्य होते.... शहरातील गलीच्छ वस्ती हीच बैंक दूर करीत असते... बँकेच्या अध्यक्षाला एक असाध्य रोग होतो..... भावी नेतृत्वासाठी स्पर्धा...... उच्चपदस्थांचे राजकारण बँकेला भरकटत नेते...... गरीब लोकांच्या संघटना बँकेचे कामकाज ठप्प करतात... एक बडा उद्योगपती बँकेला मोठा धंदा देऊ करतो.... पण तरीही बँकेची एक शाखा कोसळू लागते... ही लागण सर्व शाखात फैलावू शकते..... बनावट क्रेडिट कार्ड व बनावट नोटा करणाऱ्या टोळीचा छडा बँक लावू पहाते.....अशा विविध नाट्यमय घटना बँकेच्या या अद्भुत विश्वात घडत असतात. काळजाचा ठाव घेणारी ही कादंबरी वाचकाला बँकेचे खरेखुरे दर्शन घडवते. 'एअरपोर्ट', 'हॉटेल', 'इन हाय प्लेसेस' या कादंबऱ्यांचा लेखक आर्थर हेलीच्या 'मनीचेंजर्स' या कादंबरीचा श्री. अशोक पाध्ये यांनी केलेला त्यांच्या खास शैलीतील हा उत्कंठावर्धक अनुवाद वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.