मॅडलिन स्लेड. ती होती एका ब्रिटिश अॅीडमिरलची मुलगी. रोमा रोलाँ या फ्रेंच साहित्यिकाची मानसकन्या... तिनं वाचलं एक चरित्र, रोमा रोलाँनी लिहिलेलं. महात्मा गांधींचं ते चरित्र वाचून ती भारावून गेली. इतकी की, तिनं उभं आयुष्यच गांधीजींच्या चरणी वाहायचा निर्णय घेतला. महात्माजींनी तिच्या समर्पणभावनेला प्रतिसाद दिला. तिला आश्रमवासिनी व्हायला संमती दिली. तिचं नाव बदललं, ‘मीरा’ ठेवलं. त्या दोघांमध्ये विकसित झाले हळवे भावबंध. ते कधी वादळी ठरले, तर कधी हुरहुर लावणारे. त्या जगावेगळ्या नातेसंबंधांची आगळ्या शैलीत सांगितलेली प्रभावी भावकथा...