वपुंच्या लेखनामागचा हेतू काय असेल? त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर `मी माणूस शोधतोय.` माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. नाना स्वरूपात भेटला. कधी खया स्वरूपात, कधी खोट्या, तर कधी संपूर्ण स्वरूपात, पुष्कळदा तो निसटलाही. ह्या माणसानं मला कधी रडवलं, कधी हसवलं, कधी भुलवलं, कधी हरवलं, कधी फुलवलं, कधी थकवलं, कधी बेचैन केलं, कधी अंतर्मुख... तरीही माझा शोध चालूच आहे आणि चालूच राहणार, माझा पेशन्स दांडगा आहे. ह्याचं श्रेयही पुन्हा माणसांनीच वाढवली आहे. प्रत्येक शोधाचा काही निष्कर्ष असतो, सिद्धांत असतो. माझा शोध पूर्ण झालेला नाही, पण निष्कर्ष सापडला आहे.` `जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे.` वपुंना भेटलेल्या या माणसांच्या कथा आणि व्यथा खास वपु स्टाइलमध्ये.