‘मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन’ हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवाउद्योगाच्या नामावलीत एक महत्त्वाचा उद्योग आहे. माहिती तंत्रज्ञानात सर्वात अधिक आकर्षित करणारी एक बाब म्हणजे तुम्ही स्वत: या क्षेत्रात घरबसल्या काम करू शकता. प्रस्तुत पुस्तकात ‘मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन’विषयी सविस्तर विवेचेन असून, त्याच्या संधीप्रमाणेच धोक्यांचाही विचार लेखकाने मांडला आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या अंगाने उद्योगाची नवी क्षितीजे तयार होत असताना मराठी माणसाचे कुतूहल त्याबाबत आता वाढत आहे. हे पुस्तक अशा संगणकीय व माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग म्हणून स्वीकार करणार्यांना उपयुक्त ठरेल.