'मुंबईत राहणाऱ्या देवल पती-पत्नींनी, कोकणात किहिमला घर घेतले. त्या घराची ही अथपासून इतिपर्यंतची कहाणी. या कहाणीत घर आणि घराभोवतालचा परिसर आहे. त्यात वावरणारे कुटुंब आणि भोवतालची गडीमाणसे आहेत. समुद्राची विविध रूपे आहेत. शंखशिंपले, खडक,मासे आहेत. गावातले गावकरी आहेत, गावगप्पा आहेत. शहरवासी आणि गावकरी यांच्यातला वाद-संवाद आहे. एका उच्च शिक्षित, समाजकार्यकर्त्या, गृहिणीचे हे अनुभवकथन. लेखिकेची प्रांजळ वृत्ती, मिस्कील स्वभाव, खुसखुशीत शैली यामुळे हे अनुभवकथन रसाळ - रंजक झाले आहे. जशी काही ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या किंवा मनातल्या घराची साठा उत्तराची पाचा उत्तरी सांगितलेली कहाणी ! माझे किहीम '