सदर पुस्तकात आत्मविश्वास वाढवण्याची तंत्रं सांगितली आहेत, तसेच या विषयाशी संबंधित अनेक गोष्टींची चर्चा केली आहे. आत्मविश्वास कमी असण्याची कारणं, आत्मविश्वास वाढवण्यासाठी करावयाचे सोपे उपाय, कठीण परिस्थितीत आत्मविश्वास कसा टिकवावा, त्यासाठी सकारात्मक वृत्ती कशी आवश्यक आहे, व्यक्तिमत्त्व कसे असावे, देहबोली कशी असावी, स्वतःबरोबर इतरांचाही आत्मविश्वास कसा वाढवावा, इ. विषयी मार्गदर्शन केलं आहे आणि आत्मविश्वासाच्या अभावाने मैत्री किंवा नातेसंबंध यांच्यावर होणारे परिणाम, त्यातून उद्भवणार्या वैयक्तिक व सामाजिक समस्या याबाबतही विचार मांडले आहेत. छोट्या-छोट्या प्रश्नमालिकांचा समावेश या पुस्तकात केला आहे. एकूणच, व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणून तुमचं जीवन आत्मविश्वासाने भरून टाकणं, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. मानसशास्त्रज्ञ लेखिकेने मानसशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून केलेलं सखोल मार्गदर्शन.