मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्रीय लेखन स्फु. लेखांच्या स्वरूपात प्रकटले पण या स्फु. लेखांनी मराठी वाचक-अभ्यासक संपादक-प्रकाशक-लेखक यांची वाङ्मयीन अभिरुची उन्नत केली कारण ते लेखन विदग्ध रसिकाचे आणि अभिजात कलावंताचे निकराचे आत्मचिंतन होते मर्ढेकरांनी आपल्या चिंतनास शास्त्राचा आणि त्या शास्त्रास दर्शनाचा दर्जा मिळवून दिला ‘पुनःस्थापना’काराने सव्वीस भाष्यकारांच्या मर्ढेकरभाष्यांचा परामर्श घेऊन आपले मर्ढेकरभाष्य येथे सादर केले आहे हा प्रबंध नाही तर दृढ सूत्रात गुंफलेला हा लेखांचा गुच्छ आहे!