श्रीगणेशायनमः॥डॉ. अॅन फेल्डहाउसअमेरिकेच्या अरिझोना स्टेट विद्यापीठाच्या धर्म विषयाच्या प्राध्यापिका, महाराष्ट्राच्या धर्मपरंपरा, देवता, क्षेत्रे, तीर्थ या विषयांवर बरेच संशोधन केले आहे. डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या सहकार्याने 'ओल्ड मराठी डिक्शनरी' ह्या प्रचंड ग्रंथामुळे मराठी संतसाहित्याचा अभ्यास सोपा झाला. 'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या शोधपर ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराने 'श्री विठ्ठल' जगभर गाजला गेला. सध्या त्या नद्यांचा अभ्यास करीत आहेत.वा. ल. मंजूळमूळचे पंढरपूरचे. विठ्ठल मंदिराची वतनदारी; भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल; संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक; हस्तलिखित शास्त्राचे मानद अध्यापक; मराठी हस्तलिखित केंद्र या संस्थेचे सन्मान्य संचालक; संतसाहित्यावर अनेक ग्रंथ प्रसिद्ध; कीर्तन, ज्योतिष, ग्रंथालय शास्त्राचे अभ्यासक. महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेश, कर्नाटक येथे हिंडून संस्कृत पोथ्या गोळा केल्या.