मनुष्यबळ व्यवस्थापनशास्त्राची मराठी वाचकाला ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. हा ग्रंथ आहे दोन भागांत. पहिला भाग – मनुष्यबळ व्यवस्थापनाची व्याख्या, व्याप्ती अन् विकासाचा मागोवा घेणारा. दुसरा भाग – औद्योगिक संबंध, औद्योगिक लोकशाही, कामगार संघटना, औद्योगिक शांतता, सामुदायिक देवाण-घेवाण अशा नव्या-जुन्या संकल्पनांची ओळख करून देणारा. औद्योगिक शिस्त, कर्मचा-यांची गा-हाणी अन् त्यावरची उपाययोजना या पैलूंची मांडणी करणारा. मनुष्यबळ विकासाचे एकविसाव्या शतकातील चित्र रेखाटणारा हा ग्रंथ सामान्य वाचकांबरोबरच जिज्ञासू विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनाही मार्गदर्शक ठरेल.