सहा दीर्घ कथा असलेला संतोष शिंत्रे यांचा हा कथा संग्रह. लेखकाला ललकारणारे, अस्वस्थ करणारे, काही वेळा सुखावून जाणारे आणि काही वेळा विषण्ण करू शकणारेही विषय तर सभोवताली असतातच. त्याला कथाचे मूर्त स्वरूप येण्यासाठी वाट पहावी लागते. सारी घटिते, सत्ये, कल्पिते या सर्वांना सर्जनाच्या एका समान सूत्रात बांधणी कथाकारासाठी आवश्यक असते. असा हा कथासंग्रह वाचकांसाठी वाचनीय ठरला आहे.