Skip to product information
-
Media gallery Media gallery
Mala Vhaychay UPSC Topper by Nishant Jain
Description
Description
परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरील सर्वांगीण आणि व्यापक तयारीसाठी सविस्तर मार्गदर्शनपरीक्षेच्या तयारीदरम्यान आवश्यक; परंतु काहीशा दुर्लक्षित पैलूंवर विस्तृत चर्चास्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी कशी करावी आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण?नेहमी सकारात्मक विचारांच्या सान्निध्यात कसं राहावं? स्वत:ला सतत प्रेरित कसं करावं?• परीक्षेसाठी काय वाचावं, काय वाचू नये? अभ्यास नेमका कसा करावा?परीक्षेच्या नव्या पॅटर्नला यशस्वीपणे सामोरं जाण्यासाठी कशी असावी रणनीती?• त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांच्या काही प्रेरणादायी कहाण्या खास तुमच्यासाठी…२०१४ या वर्षी यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत देशभरातून १३ वा क्रमांक मिळविणारे निशांत जैन हिंदी/प्रादेशिक भाषांच्या माध्यमाचे टॉपर आहेत. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत त्यांनी संपूर्ण देशातून तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण प्राप्त केले. निबंध आणि वैकल्पिक विषय (हिंदी साहित्य) या विषयांमध्येही त्यांनी सर्वाधिक गुण मिळविले. उत्तर प्रदेशच्या मेरठ या शहरातील सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या निशांत जैन यांनी यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं. इतिहास, राज्यशास्त्र आणि इंग्रजी या विषयांत पदवी तसंच हिंदी साहित्यात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर ते यूजीसीतर्फे घेण्यात येणारी ‘नेट-जे.आर.एफ.’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी दिल्ली यूनिव्हर्सिटीतून एम.फिल.ची पदवीही प्राप्त केली आहे. नागरी सेवेत निवड होण्यापूर्वी दोन वर्षं ते संसदेच्या लोकसभा सचिवालयातील राजभाषा विभागात कार्यरत होते. LBSNAA, मसुरी येथील दोन वर्षांच्या आय.ए.एस.च्या ट्रेनिंगनंतर त्यांनी JNU मधून पब्लिक मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.कविता लिहिण्याचा छंद असणाऱ्या निशांत जैन यांना तरुणाईशी संवाद साधण्याचीही मनापासून आवड आहे. भाषा, साहित्य, संस्कृती, गव्हर्नन्स, मास कम्युनिकेशन, सर्जनात्मक लेखन, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यासह इतर अनेक विषयांत त्यांना विशेष रस आहे. सोशल मीडियावरील त्यांचे लेक्चर्स आणि व्हिडिओज विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. याव्यतिरिक्त ‘राजभाषा के रूप में हिंदी’ हे त्यांचं संशोधनात्मक पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टद्वारे प्रकाशित झालं आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) २०१५ च्या बॅचचे अधिकारी आहेत.
- Regular price
- Rs. 225.00
- Regular price
-
Rs. 250.00 - Sale price
- Rs. 225.00
- Unit price
- / per
-10%
Notified by email when this product becomes available
Mala Vhaychay UPSC Topper by Nishant Jain