जगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने. या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार, आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे परकी चलनाचे भांडवल. कशी चालते ही सारी यंत्रणा? कोण हाताळते हे अर्थकारण? अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी टिपणे माझी अर्थविश्वातील भ्रमंती