रोजच्या जीवनात वावरताना आपल्याला विविध प्रकारच्या प्रसंगांचा अनुभव येत असतो...कधी कडू तर कधी गोड! त्याचप्रमाणे मजेदार, गमतीदार प्रसंगांचाही अगदी सहजगत्या,नकळत अनुभव येऊन जातो. सामान्यांप्रमाणेच नामवंतांच्या आणि विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱ्यांच्याही आयुष्यात विनोदी प्रसंग उद्भवत असतात.
या पुस्तकाचे संकलक सु. ल. खुटवड यांनी अनेक चरित्र-आत्मचरित्र वाचून त्यांतील अशा विनोदी प्रसंगांची नोंद केली आणि त्यातूनच जमली आहे ही साहित्यिक, शाहीर,नाटककार, चित्रपटकार, कलावंत, राजकारणी, पोलीस खात्यातील अधिकारी, व्यावसायिक अशा सर्वांची मैफल... अर्थात 'मैफल विनोदी किस्स्यांची!'