शायरी नुसतीच नाही, गावया आलो इथे कोण्यातरी जिंदादिलांच्या, दर्शना आलो इथे प्राण साऱ्या मैफिलीचे, यांनाच आम्ही मानतो नुसतेच ना या मैफिलीचे, आमुचे स्वतःचे मानतोदोस्तहो मैफिल आपुली, रंगण्या जर का हवी आम्हा नको सौजन्य, तुमची जिंदादिली नुसती हवी ऐसे जरी नक्कीच, घेवू तुमच्या मुखाने 'वाहवा' ! ती ही अशी, ज्या 'वाहवा'ला द्यावी आम्हीही 'वाहवा' !!