मोहनदास करमचंद गांधी… यांचा आदर्शवाद आणि सत्याप्रतीची ठाम निष्ठा याची थट्टा करण्यात आली. त्यांचा साधेपणा आणि विनयशील वृत्ती याकडेही नेहमी उपहासाने पाहिलं गेलं. महात्मा गांधींनी अशा गोष्टींना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांच्यासमोर दांडगी ब्रिटिशसत्ता पार झुकली. या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या जीवनकर्तृत्त्वाचा आढावा घेतला आहे. बालवयात एका विचारी आणि शांतस्वभाव असलेल्या मुलाचं व्यक्तिमत्त्व बघता बघ पार बदललं. अत्यंत समर्थ, सक्षमवृत्ती आणि निर्धाराचं ते चालतं बोलतं प्रतीक बनले. लक्षावधी लोकांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत चेतवून त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा बळकट केला.