इ.स. १९५६ मध्ये परदेशी लोकांसाठी तिबेटचे दरवाजे बंद होते. ह्याच काळात तिबेटने भारताबरोबरचे आपले राजकीय संबंध पूर्णपणे तोडले होते. अशा ताणतणावाच्या काळात वयाच्या १५ व्या वर्षी बिमल डे घरातून बाहेर बाहेर पडले आणि कोणत्याही पूर्व तयारीशिवाय ते तिबेटकडे निघाले. नेपाळी तीर्थयात्रेकरून कारुंच्या एका गटात ते मौनी बाबा बनून सामील झाले . ल्हासापर्यंत त्यांनी ह्या यात्रेकारुंच्या बरोबर प्रवास केला आणि नंतर ते एकटेच कैलास पर्वताकडे निघाले.
त्यांचा प्रवास अतिशय गूढ, अदभूत व रोमांचकारी असा आहे. अनंत अडचणीतून सामोरे जात,त्यांनी हा महाप्रवास केला आहे. ह्या सगळ्या अनुभवांचे वर्णन त्यांनी ह्या पुस्तकात केले आहे.