एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह बंडाचा पवित्रा घेतल्यापासून ते त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापर्यंतचा घटनाक्रम या पुस्तकातून उलगडला आहे... एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं... उद्धव यांचं मुख्यमंत्रीपद तर धोक्यात आलंच; पण शिवसेनाही त्यांच्या हातात राहते की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांना हे पाऊल का उचलावं लागलं? शिंदे यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द, शिवसेनेत आतापर्यंत झालेली बंडं इ. बाबीही या पुस्तकातून समोर येतात...एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून ते त्यांच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा घटनाक्रम प्रसारमाध्यमांमधून सगळ्यांनी अनुभवला...पण यात पडद्यमागीलही काही खेळी होत्या, त्यांचा उल्लेख, विश्लेषण आणि हा सगळा घटनाक्रम संकलित स्वरूपात वाचताना त्यातून निर्माण होणारं नाट्य...हे या पुस्तकाचं वेगळेपण आहे...एका राजकीय नाट्याचा प्रवाही भाषेत घेतलेला अभ्यासपूर्ण धांडोळा..