मानवी जीवनातील नियतीशरणता म्हणजे काय, याचा प्रत्यय देणारी ही कादंबरी स्वप्न आणि वास्तव यांतील अंतर अधोरेखित करते. ह्या कादंबरीतील पात्रे, घटना, प्रसंग, मानवी मन हे आपल्याच आजूबाजूच्या घटनांचे प्रतिनिधित्व करतात. अलंकारिक भाषेचा मोह टाळल्यामुळे ही कादंबरी व त्यातील पात्रे अधिक सजीव वाटतात. कृत्रिमता टाळून प्रभावी आणि ओघवत्या शैलीत लिहिल्यामुळे ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल ही खात्री आहे.