* मला मधुमेह का झाला?* मधुमेह कधीच बरा होत नाही का?* मधुमेहामुळे मला अंधत्व येऊ शकेल का?* मधुमेह आनुवंशिक आहे का?……मधुमेहाचं निदान झाल्यानंतर मनामध्ये अशा प्रश्नांचं काहूर माजतं. मात्र योग्य जीवनशैली अंगिकारल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. यासाठी मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांचं हे पुस्तक म्हणजे ग्रंथरुपी दिलासा आहे.मधुमेह होऊ नये यासाठीच्या मार्गदर्शनाबरोबरच ‘मधुमेह’ या विषयावरची संपूर्ण बाराखडीच त्यांनी या पुस्तकात दिली आहे.* मधुमेह म्हणजे काय?* त्याच्याशी मुकाबला कसा करावा?* आहार आणि व्यायामाचं नियोजन कसं करावं?* गुंतागुंतीच्या व्याधी टाळण्याकरता कोणती दक्षता घ्यावी?अशा सर्व कळीच्या मुद्यांवर तपशीलवार व उदाहरणांसहअत्याधुनिक मार्गदर्शन यात मिळेल.मधुमेहाबद्दलची सर्व माहिती देत, त्याच्याशी निगडित समज-गैरसमज दूर करून शास्त्रशुध्द पध्दतीने या आजाराकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोन रुजवणारं पुस्तक !