अहो माझे बाप, आता माझ्यावर कृया करा.माशांचे महाराज, आता माझ्यावर कृपा करा.आता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर, सडलेलं मांस,कुजके दुर्गंधीयुक्त मांस आणलं आहे.तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिला आहे.मी शुद्ध नरबळी दिला आहे. त्याचा स्वीकार करा.त्या घासानं तुप्त व्हा. ही जागा मी तुमच्यासाठी निवडलीत्या या जागेवर मी तुमची खूण केली आहे.त्या या जागेला तुमच्या नावाचा मान दिला आहे. त्या या जागी प्रकट व्हा,त्या या जागी मला खूण दाखवा, त्या या जागी मला प्रेरणा द्या.मी तुमच्या कार्याची सुरूवात करीन. अहो माझे बाप, आता घास घ्या.’त्याच्या दोन्ही हातांवरचं वस्त्र गळून खाली पडलं.त्याच्या दोन्ही हातांवर एका लहान मुलाचा विश्चल देह होता.तो वाकून त्यानं सावकाश खाली ठेवला.तो दोन पावलं मागं सरला.आधीचीच शांतता. आता तर ती आणखी गडद झाली.वारा थांबला. जणू हवेतल्या सर्व काणांचीही हालचाल थांबली.काहीतरी झालं – शब्दांत वर्णन करता येण्यापलीकडचं.खडकावरच्या मृत शरीराचं मासं काळं-निळं पडलं,वितळल्यासारखं प्रवाही झालं, त्याचे ओघळ वाहायला लागले,उकळल्यासारखे त्यात बुडबुडे उठायला लागले-आणि तो काळा लगदा खडकात शोषला जायला लागला.‘सक्! सक्! सक्!’ आवाज येत होता.पाणाळलेलं अस्थी – मांस- मज्जा त्वचा-रूधीर शोषलं जात होतं.शेवटी तिथं फक्त एक काळा डाग राहिला-न ओळखता येण्यासारखा…