आपल्या विभक्त झालेल्या नवर्यापासून कायमची सुटका करून घेण्याच्या फुशारक्या जेन मारत असताना पायरो उपस्थित होता. नंतर त्या सैतानी माणसाचा शेवट झाला होताच. पण तरीसुद्धा कुठंतरी आपली फसवणूक होत आहे असं या थोर बेल्जिअन गुप्तहेराला वाटत होतं.
काहीही झालं तरी आपल्या मित्रमंडळीबरोबर जेवण करत असतानाच जेन त्याचा भोसकून खून कसा करू शकेल? आणि तोसुद्धा त्याच्या घरातील ग्रंथालयात? आणि त्यानं घटस्फोट दिल्यानंतर त्याचा खून करण्यामागे तिचा हेतू तरी काय असावा?
‘ही कथा म्हणजे पायरोजवळ असणार्या विशेष गुणांची विजयगाथाच आहे.’
- टाईम्स लिटररी सप्लिमेंट