वासुदेव, गोंधळी, भुत्ये, भराडी, शाहीर, वाघ्यामुरळी इ. लोकसंस्कृतीच्या उपासकांचा परिचय करून देणारा हा ग्रंथ महाराष्ट्रातील सांस्कृतिक प्रबोधनाच्या इतिहासाचा नवा बोध घडविणारा आहे. लोकसंस्कृतीच्या अनेकविध उपासकांच्या उपासनापद्धती आणि त्यांचे परंपरागत मौखिक वाङ्मय यांचा अभ्यास महाराष्ट्रातील दैवताविज्ञानाच्या क्षेत्राला कसे योगदान देतो, याचे हे मौलिक दर्शन आहे. लोकधर्म आणि लोकनाट्य यांच्या स्वरूपावर एकाचवेळी प्रकाश टाकणारा मराठीतला हा पहिलाच ग्रंथ आहे.