प्रस्तुत लेखसंग्रहात सात लेख समाविष्ट केलेले आहेत. त्या लेखनिर्मितीमागे लोकवाङ्मयाच्या निर्मितीमागील प्रेरणांचा वेध घेऊन, लोकवाङ्मय अभ्यासाची मांडणी - व्यवस्थापन कसे करता येईल, यासंबंधीची आपली भूमिका लेखकाने मांडली आहे. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या साधार चिंतनाचा व मननाचा हा आविष्कार लोकसाहित्याच्या अभ्यासकांना निश्चित मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.