'सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार हा देशासमोरचा ज्वलंत प्रश्न. अस्तित्वच गिळू पाहणारा... लोकपाल विधेयक संसदेने पारित केले की, जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे भ्रष्टाचाराचा भस्मासुर वठणीवर येईल, अशी आपली भोळ्याभाबड्या जनसामान्यांची समजूत... ती निराधार आहे. राजकीय इच्छाशक्ती नसेल, तर अशी कितीही वैधानिक आयुधे परजली, तरी भ्रष्टाचाराचे निर्मूलन होऊ शकणार नाही, हे सर्व संबंधितांनी नीट समजून घेतले पाहिजे. एका ज्येष्ठ मुरब्बी सनदी अधिका-याने मूळ समस्येचे केलेले हे परखड विश्लेषण वाचले म्हणजे मग कुणालाही भ्रमनिरासाचा धक्का बसणार नाही.