शास्त्रीय संगीत, चित्रकला, नाटक, छायाचित्रण, स्तंभलेखन, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, भावगीत-गायन, इ. सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय अशा अनेकानेक क्षेत्रांमध्ये शीर्षस्थानी असलेल्या, तीस बहुचर्चित महाराष्ट्रीयांची जीवनशैली धावत्या शब्दांत वर्णन करणाऱ्या लेखांचा हा आगळावेगळा संग्रह आहे. एक दिवसाच्या भेटीगाठीत मारलेल्या मनमोकळ्या गप्पांतून त्या त्या व्यक्तीच्या जीवनविषयक दृष्टीकोन, आवडीनिवडी, राहणीमान, श्रद्धेय गोष्टी, छंद आणि असं आजवर माहीत नसलेलं बरंच काही उलगडत तर जातंच; पण काही ना काही कारणानं त्यांच्या विषयात मनात रुजलेले गैरसमजही नकळत नाहीसे होतात. सुप्रसिद्ध निवेदक व स्तंभलेखक श्री. सुधीर गाडगीळ यांनी निमित्तानिमित्तानं केलेलं लेखन आता `लाइफ-स्टाइल` या ग्रंथनामाखाली इथे एकत्रित प्रसिद्ध होत आहे.