Skip to product information
1 of 1

L'Exile Et Le Royaume by Albert Camus

Description

आपल्या मातृभूमीवर - ‘अल्जेरिया’वर - राज्य करणार्‍या फ्रेंच वसाहतवाद्यांवर, त्यांच्या दडपशाहीवर आल्बेर काम्यूचा राग होता. त्यांची निष्ठा ना फ्रेंच होती, ना अल्जेरियन - ती मानवतावादी होती. नोबेल मिळाल्यानंतर कधीतरी एकदा त्यांनी केलेले विधान प्रसिद्ध आहे. ‘लोक आता ट्राममध्ये बाँब लावत आहेत. अशा एखाद्या ट्राममध्ये माझी आईदेखील असू शकते. यालाच जर न्याय म्हणायचे असेल, तर मी न्यायापेक्षा, आई स्वीकारेन.’ त्यामुळे ना धड फ्रेंच, ना अल्जेरियन अशी त्यांची विचित्र फसगत झाल्यासारखी लटकलेली अवस्था. शरीराने फ्रान्समध्ये राहूनही मनाने, भावनेने ते अल्जेरियातच राहिले. या अर्थाने, काम्यू केवळ भौगोलिकदृष्ट्या निर्वासित नव्हते, तर वैचारिकदृष्ट्याही निर्वासित होते. त्यामुळे ‘निर्वासित असणे’ ही थीम त्यांच्या साहित्यात सतत जाणवते. ‘लेक्झिल ए ल रोयोम’ हा फ्रेंच कथासंग्रह इंग्रजीत 'Exile and the Kingdom' नावाने प्रसिद्ध आहे. या कथासंग्रहात 'exile' म्हणजे निर्वासित असणे व 'Kingdom' म्हणजे त्यातून मोकळे होऊन मिळणारे स्वातंत्र्य, अशा दृष्टीने काम्यूने रूपके मांडली आहेत. यातील पात्रांचे निर्वासित असणे हे भौगोलिक आहे, मानसिक आहे, भावनिक आहे अथवा वैचारिक आहे. सामाजिक बांधिलकी, शिष्टाचार, जडणघडण यांतून मनावर येणारे ओझे, बंधन व त्यातून समाजाबद्दल निर्माण होणारी अढी, दुरावा या अर्थी कथेतील पात्रं निर्वासित होतात. मात्र यातून मुक्त होण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते समाजापासून अधिक अलिप्त होतात, असे जाणवते.    पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘लेक्झिल ए ल रोयोम’चा हा अनुवाद मूळ फ्रेंच भाषेतून जयंत धुपकर यांनी मराठीत केला आहे.
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Pulication: Padmagandha Prakashan
L'Exile Et Le Royaume by Albert Camus
L'Exile Et Le Royaume by Albert Camus

Recently viewed product

You may also like