आयोकासारखी कर्तबगार माणसे ही नुसती व्यवस्थापक नसतात. ते उद्योजक आहेत. एवढेच नव्हे तर असामान्य नेतृत्वाचे सर्व गुण त्यांच्यात आहेत. असे नेते स्वप्नवत् वाटणाऱ्या कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणून उभ्या करू शकतात. त्यासाठी प्रचंड जिद्द, आत्मविश्वास नि विलक्षण कर्तबगारी त्यांच्यात असते. सभोवतालच्या परिस्थितीस अनुसरून ते आपली धोरणे आखत नाहीत तर ही परिस्थिती स्वकर्तृत्वाने बदलून टाकण्याचे सामर्थ्यही त्यांच्यात असते. सर्व परिस्थिती प्रतिकूल असतानाही आयोकांनी आपल्या बुद्धिकौशल्याने, आपल्या कष्टाने परिस्थिती स्वतःला अनुकूल करून घेतली. आधुनिक काळातील ही विलक्षण किमया आहे. एका विलक्षण जिद्दी माणसाची ही कहाणी आहे..