'अशोक डांगे यांनी साकारली आहेत, ही त्यांच्या स्मरणसाखळीतली माणसं! पन्नाससाठ वर्षांपूर्वीचं कोकणातलं खडतर जीवन..... त्यात आपापल्या कुवतीनुसार वाट शोधणारी माणसं. एकीकडे लंगडी दयाळू आजी! दुसरीकडे क्रूर रावणमामा आणि शूर पाध्ये अण्णा ! बाकी मध्ये आहेत परिस्थितीनुसार वाकणारी माणसं कधी दुबळी ठरणारी, कधी स्वार्थी होणारी. पण स्वत:च्याच नादात चिवटपणे जगणारी! हे पुस्तक म्हणजे दारिद्र्याच्या आटपाट नगरातल्या अगतिक माणसांची कहाणी. कोकणच्या ग्रामीण जीवनावरील ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी कथन केलेली!