जल्लाद...हा शब्दही अंगावर शहारे आणणारा. स्त्रियांच्या नाजूक स्वभावाकडे पाहता हे काम कुणी स्त्री करू शकेल, याबाबत क्वचितच कुणाला विश्वास बसेल. पण बावीस वर्षीय चेतना मुल्लीक वर जल्लाद या वडिलोपार्जित कामाची जबाबदारी येते. आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं नवं वळण घेतं. सामाजिक गृहितकांंना धक्का देत वेगळ्या वाटा धुंटाळणारी ही चेतनाची कहाणी अनेक अर्थ्यांनी वाचकांसाठी उत्कंठावर्धक आहे.