तत्त्वज्ञानाबाहेरचा तत्त्वचिंतक’ अशी काम्यूची व्याख्या केली जाते. त्याने तत्त्वचिंतनाच्या रूढ पद्धतींना छेद दिला.
मानवी अस्तित्वाचे प्रश्न, मृत्यूची निरर्थकता, ईश्वराला नाकारून, कृतीला दिलेले महत्त्व, नियतीसमोर त्याने निर्माण केलेले प्रश्न, बंडाच्या वेगळ्या कल्पना, शून्यवाद अशा अनेक मुद्द्यांतून काम्यूचे जीवन आणि तत्त्वज्ञान समजून घ्यावे लागते.
‘ला मिथ द सिसीफ’ हा आल्बेर काम्यूच्या ‘अॅबसर्डिझम’ या वैचारिक भूमिकेचे विवरण करणारा निबंध आहे.
ला मिथ द सिसीफ । आल्बेर काम्यू अनु. योगिनी मांडवगणे । पद्मगंधा प्रकाशन