`उपरा’कार लक्ष्मण माने...कैकाडी समाजातल्या या माणसाने शिक्षण घेतलं, प्रतिष्ठा मिळवली, लोकप्रियताही मिळवली...यशवंतराव चव्हाण, शरद पवार, अनिल अवचट, डॉ. बाबा आढाव यांच्यासारख्या नामवंतांच्या हृदयात स्थान मिळवलं...असंख्य वंचितांना मार्गाला लावलं...वंचितांच्या मुलांसाठी शिक्षणसंस्था सुरू केली...आमदारही झाले...पद्मश्रीपर्यंत मजल मारली...आणि वयाच्या साठीनंतर जीवनाची कृतार्थता त्यांना धन्य करत असतानाच त्यांच्यावर आलं एक `किटाळ’...साधंसुधं नव्हे...सहा बायकांवर बलात्कार केल्याचं...आणि मग...माध्यमांनी केलेली बदनामी, सगळ्या कुटुंबावरच झालेला आघात, पोलीस कोठडीत, न्यायालयीन कोठडीत अनुभवावा लागलेला नरक...त्या दरम्यान आलेले काही भले अनुभव...मनात चाललेलं द्वंद्व... याबद्दलचं निवेदन...त्यांच्याच संस्थेत काम करण्याऱ्या बायका का उलटल्या त्यांच्यावर? विद्रूप चेहऱ्याच्या माणसांनी रचलेल्या षड्यंत्रातून बाहेर पडण्यासाठी माने यांनी केलेला संघर्ष त्यांच्याच जळजळीत भाषेत...