या लोककथा एखाद्या खजिन्यासारख्या आहेत. त्यात डोकावलं की लांबून का होईना, पण मोठ्या जगाशी आपली भेट होते. या जगाचं, तिथल्या अनुभवाचं बोट धरलं तर कुमारांना आपल्या भोवतीचं जग, तिथली माणसं, त्यांच्या कल्पना आणि त्यांचे परस्पर संबंध अधिक नेमकेपणानं समजत जातील असं मला वाटतं. देश आणि प्रांत भिन्न असले तरी एकसारख्या मूल्यांचा, त्यात उत्कट भावनांचा प्रत्यय या कथा वाचतांना येईल.