केवळ कायदे करून काम भागत नाही, तर ते ज्या नागरिकांसाठी असतात त्यांच्यापर्यंत त्यांना कळेल अशा भाषेत पोहोचविणे अगत्याचे असते. एरवी ‘कायद्याचे राज्य’ या कल्पनेला अर्थच उरत नाही. त्या दृष्टीने ‘कायदाकोश’ हे महत्त्वाचे पाऊल आहे.कायद्यांना लोकमताचे अधिष्ठान प्राप्त झाले नाही तर कायदा प्राणवान होत नाही. कायदे इंग्रजीत केले जातात. इंग्रजी किती लोकांना कळते? म्हणून सामान्य नागरिकांपर्यंत कायदा पोहोचविण्यासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता असते. लोकशिक्षणाच्या दृष्टीने टाकलेले हे भरीव पाऊल आहे, अशा पुस्तकाची फार गरज होती.’– न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी• पोलीस पाटील कायदा• धार्मिक स्थळांचा गैरवापर निषिद्ध• शस्त्रास्त्रे कायदा• टाडा• झाड जगवा, झाड वाढवा• प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा• पशु-पक्षी-वनस्पती संरक्षण• गोहत्या बंदी कायदा• सरकारकडे अर्ज कसा करावा?• विधान मंडळाचे विशेषाधिकार• निवडणूकविषयक कायदे• महिला व मुलांच्या संस्थांनापरवाना आवश्यक• प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा• जन्म-मृत्यू नोंदणीविषयक कायदा• शासकीय कर्मचाऱ्यांची वर्तणूक आणि शिस्त• ग्राहक संरक्षण कायदा• राष्ट्रध्वज संहिता• मानवी अवयव प्रत्यारोपण कायदाआणि असे इतर दैनंदिन व्यवहारात लागणारे ३५ कायदेसरळ-सोप्या मराठीत प्रथमच!