Skip to product information
1 of 2

Katha Pandurangachya ( कथा पांडुरंगाच्या) by V L Manjul

Description

श्री. वासुदेव लक्ष्मण मंजूळ ( मूळचे पंढरपूरचे जन्म १७/६/१९३५). आजोबा कै. त्र्यंबकराज अग्निहोत्री, वडील लक्ष्मणशास्त्री कीर्तनकार, नामवंत ज्योतिषी, गायक. घराण्यात विठ्ठल मंदिरात पुराण सांगण्याची परंपरा. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुण्यात प्राच्य-विद्या-भूषण डॉ. रा. ना. दांडेकरांच्या आग्रहाने भांडारकर संशोधन संस्थेच्या ग्रंथालयात नोकरी. १९५९. २८ वर्षे मुख्य ग्रंथपाल.या काळात अनेक देशी-विदेशी शोध प्रकल्पांना आणि विद्वानांच्या संशोधनालासहकार्य. संस्थेसाठी बारा हजार हस्तलिखिते दान स्वरुपात संकलित केली. अनेक ग्रंथ मिळविले. १९९९ साली निवृत्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विश्वभारत सांस्कृतिक केंद्राचे तीन वर्षे संचालक आणि त्यानंतर मराठी हस्तलिखितासाठी 'मराठी हस्तलिखित सेंटर' संस्था स्थापन केली. संचालक पदावरून हजाराहून अधिक संतांच्या हस्तलिखितांचा संग्रह, साडेचार हजारांच्या शास्त्रीय नोंदी, पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ हस्तलिखित शास्त्राचे मानद प्राध्यापक, अ. भा. कीर्तनकुल, फलज्योतिष अभ्यास मंडळ, महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषद आदि संस्थांचे संस्थापक सदस्य, अ. भा. प्राच्यविद्या परिषद, हिस्टरी काँग्रेस महाराष्ट्र कल्चर अॅन्ड सोसायटी, रामायण परिषद, इत्यादि देशी-विदेशी परिषदांना हजर, शोधनिबंध वाचन.आतापर्यंत अनेक पुरस्कार. त्यामध्ये ग्रंथालीचा आस्थेवाईक ग्रंथपाल,कोशकार केतकर आदर्श ग्रंथपाल (पुणे मराठी ग्रंथालय), ऋग्वेद अभ्यासक याज्ञवल्क्य भूषण, विधिलिखित ब्रह्मभूषण, फलज्योतिष जीवन गौरव, भांडारकर संस्था आदर्श कर्मचारी इत्यादी पुरस्कारांचा समावेश. सुमारे पंचवीस ग्रंथांचे लेखन संपादन केले आहे. संत साहित्याच्या व्यासंगातून याग्रंथाची निर्मिती झाली.कण्वशाखाभूषण• सुशील माधव भक्तीसेवा पुरस्कार.
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Katha Pandurangachya कथा पांडुरंगाच्या by V L Manjul
Katha Pandurangachya ( कथा पांडुरंगाच्या) by V L Manjul

Rs. 125.00

Recently viewed product

You may also like